Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठा बदल; पाहा आजचा भाव किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। दिवाळीच्या शुभ मुर्हुतावर सोन्याचे दर दिवसांदिवस दर वधारत आहे. दिवाळी म्हटली की सोन्याचे लोक आर्वजून सोन्याचे दागिने खरेदी करतात म्हणून सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलेले पाहायला मिळतात. मात्र, लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त साधत तुम्ही तुमची दिवाळी अधिक उजाळू शकतात. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याची किंमत १२९३ रुपयांनी कमी झाली आहे.

सराफा बाजारात सोन्याची किंमत
दिवाळीत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता सोन्याच्या चमकेची झळ थोडी कमी बसणार आहे. मागील काही दिवस सोन्याचा भाव विक्रमी उच्चांक गाठतोय परंतु आज सोन्याचा भाव कमी झाला आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०,५६० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,८५० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज ९७,००० रुपये इतकी आहे.

वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत आज घट नोंदवली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज १२९३ रुपयांच्या घसरणीसह ७९, ६१६ रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७९,७३६ रुपयांवर झाला. आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर कराराची किंमत ही ७८,४४३ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये
पुणे ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये
नागपूर ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये
कोल्हापूर ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये
जळगाव ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये
ठाणे ७३,८५० रुपये ७४,५५० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये
पुणे ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये
नागपूर ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये
कोल्हापूर ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये
जळगाव ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये
ठाणे ८०,५६० रुपये ८१,३३० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *