IND vs NZ 3rd Test,Day 2: न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा डाव गडगडला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर ९ गडी बाद १७१ धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंडचा संघ १४३ धावांनी आघाडीवर आहे.


भारतीय संघाचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले. पहिल्याच षटकात टॉम लेथम १ धाव करत माघारी परतला.

त्यानंतर डेवोन कॉनव्हे २२ आणि विल यंग ५१ धावा करत माघारी परतला. सुरुवातीचे प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर रचिन ४, डॅरील मिशेल २१, टॉम ब्लंडेल ४ आणि ग्लेन फिलिप्स २६ धावांवर माघारी परतला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना सर्वांनीच चांगली गोलंदाजी केली. आर अश्विन ३ तर रविंद्र जडेजाने ४ गडी बाद केले. आकाश दीप १ आणि वॉशिंग्टन सुंदरने देखील १ गडी बाद केल्या.

भारतीय संघाला अडीच दिवसात सामना जिंकण्याची संधी
मालिकेतील सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. हा सामना गमावून भारतीय संघावर व्हॉईटवॉशचं संकट आहे. मात्र गोलंदाजांनी भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं आहे. भारतीय संघाला हा सामना अडीच दिवसांत जिंकण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाने केल्या २६३ धावा
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २६५ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना,शुभमन गिलने सर्वाधिक ९० धावा केल्या. तर रिषभ पंत ६० धावा करत माघारी परतला. तर वॉशिंग्टन सुंदरने ३८ आणि यशस्वी जयस्वालने ३० धावांची खेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *