महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालट केला – नितीन काळजे यांचे प्रतिपादन

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : विशेष प्रतिनिधी : पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा प्रचंड कायापालट केला आहे. दहा वर्षांपूर्वीची गावे आणि आत्ताची गावे याची तुलना केली तर आमदार लांडगे यांनी समाविष्ट गावांचा केलेला विकास डोळ्यात भरतो असे प्रतिपादन माजी महापौर नितीन काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

           काळजे म्हणाले की , दहा वर्षांपूर्वी समाविष्ट गावे विकासापासून वंचित होती. एकही आरक्षण विकसित झाले नव्हते. २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून नवीन गावांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली. विकास आराखड्यातील रस्ते झाले. च-होली, डुडुळगाव या भागात ५२ किलोमीटरचे रस्ते झाले. मोशी, चिखली भागात सुमारे ४० किलोमीटरचे रस्ते झाले असे काळजे म्हणाले.
             वाघेश्वर टेकडी उद्यान, चऱ्होली येथील बैलगाडा घाट, अडीच एकर जागेत केलेले क्रीडांगण, वडमुख वाडी येथील स्विमिंग टॅंक, मोशी येथे साकारण्यात आलेले अतिशय सुंदर उद्यान, च-होली येथील स्मशानभूमी व दशक्रिया घाट, मोशीचा व चिखली येथील दशक्रिया घाट आदी विकास कामांचा उल्लेख काळजे यांनी केला. महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात एकही वाडी वस्ती  विकासापासून वंचित राहिलेली नाही असे काळजे म्हणाले.
    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकाराम नगर येथे उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या पेक्षा मोशी येथे साडेआठशे बेडसचे अद्यावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे काळजे यांनी सांगितले. आमदार महेशदादा लांडगे यांनी एकूणच भोसरी मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला असून त्यामुळे ते तिसऱ्यांदा निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *