महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 0७ नोव्हेंबर ।। चिंचवड विधानसभा मतदार मतदारसंघातील भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा बुधवारी पिंपळे सौदागर भागात गावभेट दौरा झाला. यावेळी आयोजित गावभेट दौऱ्या दरम्यान पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्यने त्यात सामीलही झाले.
माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न (बापू) काटे, केशव घोळवे,निर्मला कुटे, शंकर काटे, प्रकाश झिंजुर्डे, भानदास काटे, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, जगन्नाथ काटे, जयनाथ काटे, अनिल काटे, कैलास कुंजीर, शेखर कुटे, बाळासाहेब काटे, चंद्रकांत काटे, पोपट काटे, विकास काटे, दीपक नागरगोजे, गिरीश जाचक, अतुल पाटील, महेंद्र झिंजुर्डे, नानासाहेब निवृत्ती काटे, निलेश काटे, बाळासाहेब चौधरी, राजेंद्र जयस्वाल, विजय भिसे, सोमनाथ काटे, राजाराम काटे, संतोष काटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे भागवत झोपे, रमेश वाणी, संकेत कुटे यांच्यासह पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात हिंद कॉलनी, यशवंत नगर, श्री स्वामी समर्थ कॉलनी, बापूसाहेब शिंदे कॉलनी, विश्वशांती कॉलनी, काटे वस्ती, भिसे पार्क या भागातुन गाव भेट दौरा करत पदयात्रा काढण्यात आली. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” “शंकर भाऊ जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी पिंपळे सौदागर परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. गाव भेटी दरम्यान घरोघरी महिलावर्गाकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात निष्ठेने कार्यरत असलेले आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध विकासकामांमुळे चर्चेत आलेले स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे सौदागर भागात विकासाची गंगा आणली. त्यामुळे हा परिसर पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जावू लागला.
दरम्यान, सर्व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधताना शंकर जगतापांनी निवडून आल्यानंतर लगेचच या भागातली प्रलंबित विकास कामे पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. यापुढे नागरिकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनीही आपले पूर्ण समर्थन शंकर जगताप यांनाच असून त्यांनाच मत देणार असल्याचे जाहीर केले.
उमेदवार शंकर जगताप यांनी विठ्ठल झिंजुर्डे, वसंत काटे, सागर भिसे, शांताराम काटे, कालिदास काटे, भानुदास काटे, नारायण काटे, कुंदन जाचक, बाळा जाचक, गिरीश जाचक, सौरभ जाचक, चंद्रकांत मुरकुटे, उत्तम कुंजीर, प्रसाद शिंदे, कपिल कुंजीर, निलेश कुंजीर, संतोष नवले, राम काटे, प्रवीण कुंजीर, अजय कुंजीर, माजी नगरसेविका सुभद्रा जगताप, संदीप काटे, निलेश काटे, केतन काटे, प्रसाद घणवटे, महेंद्र झिंजुर्डे, नारायण काटे, मल्हारी कुटे, उमेश काटे, शाम काटे, रमेश काटे, बबन झिंजुर्डे, अनिल काटे, नामदेव भिसे यांच्यासह पिंपळ सौदागर मधील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या.
पिंपळे सौदागर प्रभागासाठी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या आमदार निधीतून विविध सोसायट्यांमध्ये विद्युत सोलार सिस्टीम बसविण्यात आले. तसेच सोसायट्यांमधील पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. आरक्षण क्र.३६१ येथील आरक्षित ५० गुंठे जागेत विद्यार्थ्यांकरिता वाहतूक नियमांचा अभ्यास होण्याकरिता चिल्ड्रन ट्राफिक पार्क उभारण्यात आले. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून लिनीअर गार्डनची यशस्वी संकल्पनाही राबविण्यात आली, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.
