संत तुकाराम नगरच मध्ये घड्याळाचा गजर : वातावरण झालेअण्णामय

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी (दि. 9) संत तुकाराम नगर, लांडेवाडी, महात्मा फुले नगर, वल्लभनगर परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला संत तुकाराम नगर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी योगेश बहल, सदाशिव खाडे, यशवंत भोसले, जितेंद्र ननावरे, सुजाता पालांडे, श्याम लांडे, ज्ञानेश्वर कांबळे, फजल शेख, निलेश अष्टेकर, बबन गाढवे, राखी धर, अश्विनी शेलार, नेहा अढवळे, रूपाली धाडवे, पल्लवी कांबळे, राजेश वाबळे, नरेश केकाडे, पुरुषोत्तम वायकर, राज काची, ज्ञानेश लोहार, नारायण बहिरवडे, किरण सुवर्णा, माधव अडसुळे, दीपा मुरकुटे, संगीता खरात, सोनी शेवाळे, अंजली सारसर, दीपक पाटील, शेखर पाटील, जयदेव अक्कलकोटे, देवदत्त लांडे, विकास लांडे, माऊली थोरात, सुनील लांडे, गणेश संभेराव, कारभारी झंजाड, गोरोबा गुजर, वर्षा जगताप, हरप्रीत सिंग, रुपेश खत्री, मनीष घोष, सदाशिव खांडे, मायला खत्री, सुनील पालांडे आणि महायुतीच्या घटपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रा दरम्यान संत तुकाराम नगरचे वातावरण अण्णामय झाले. आलं आलं घड्याळ आलं, येणार येणार घड्याळ येणार, इकडून येणार तिकडून येणार घड्याळ येणार, अण्णा बनसोडे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आपले अण्णा पिंपरीत पुन्हा, अशा घोषणांनी संत तुकाराम नगर दुमदुमून निघाले.

संत तुकाराम नगर, गंगानगर, महेश नगर, डॉ अब्दुल कलाम गार्डन, महेश नगर सोसायटी, ययाती सोसायटी, अक्षय सोसायटी, एमआयजी परिसर, यशवंत चौक, लेटेस्ट चौक, वल्लभनगर, गंगा स्काईज, स्वरगंगा, भूखंड साई मंदिर, फुले नगर, लांडेवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर, उत्कर्ष स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळ, गणेश मंदिर, बौद्ध विहार, अमरज्योती मित्र मंडळ, तुळजाभवानी मंदिर, शिव प्रतिष्ठान, दत्त मंदिर, जय भारत मित्र मंडळ, सुवर्णयोग मित्र मंडळ, विश्वकर्मा मंदिर, साई मंदिर येथे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या घरी आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.

आमदार अण्णा बनसोडे पुन्हा निवडून येणार असा विश्वास संत तुकाराम नगर मधील नागरिकांनी व्यक्त केला. प्रत्येक गल्लीत जाऊन अण्णा बनसोडे यांनी जनतेचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतिषबाजी आणि क्रेन मधून फुलांची उधळण करत आमदार बनसोडे यांचे संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, महात्मा फुले नगर आणि लांडेवाडी मधील नागरिकांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *