BSNLचा ३६५ दिवसांचा रिचार्ज, ५ रूपयांत दिवसाला मिळणार २ जीबी डेटा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० नोव्हेंबर ।। सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने नुकताच आपला वर्षभराचा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंगी सुविधा मिळते. खरंतर, बीएसएनएल हळू हळू देशात आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहे. अशातच खाजगी कंपन्यांच्या महागड्या प्लान्सच्या तुलनेत बीएसएनएल लोकांना स्वस्तात प्लान देत आहे.

५ रूपयांत दररोज २ जीबी डेटा
जर तुम्ही कमी किंमतीत दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत असाल तर बीएसएनएलच्या यादीत एक स्वस्त रिचार्ज प्लान आहे. यात लोकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस मिळतात.कंपनीच्या या प्लानची किंमत २३९९ रूपये ठेवण्यात आली आहे. या प्लानसोबत तुम्हाला दररोज ५ रूपये खर्च करून अनेक सुविधांचा लाभ उचलू शकता.

७९९ रूपयांचा प्लान
बीएसएनएलचा ७९९ रूपयांचा प्लान खूप प्रसिद्ध आहे. हा एक वार्षिक प्लान आहे. याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज खर्चासाठी ५ रूपये खर्च येतो. यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळतो.

वर्षभर सिम राहील अॅक्टिव्ह
जर तुम्हा हा प्लान खरेदी करण्याचा विचार करत आहात तर यात मिळणारी सुविधा केवळ ६० दिवसांसाठी असते. तुम्हाला कॉलिंग आणि डेटाची सुविधा केवळ ६० दिवसांसाठी मिळते. यानंतर ही सुविधा बंद होते. मात्र तुमचे सिमकार्ड संपूर्ण ३६५ दिवसांसाठी अॅक्टिव्ह राहील.

या सिमकार्डवर इनकमिंग कॉलची सुविधा चालू राहील. आऊटगोईंग सुविधेसाठी तुम्हाला टॉप अप प्लान वेगळा घ्यावा लागेल. हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *