‘दारात तुळस, मंदिरावर कळस आणि 20 तारखेला मतदान करण्यास करू नका आळस’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ नोव्हेंबर ।। जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णानगर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडांगण येथे तुलसी विवाह मोठ्या थाटात पार पडला. 1000 दिव्यांचा दीपोत्सव करून विवाह संपन्न झाला. ‘तुळशी विवाह याचे महत्व, पाषाण रुपी देव का झाला’ हे पौराणिक दशावतार नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. दारात तुळस, मंदिरावर कळस आणि येत्या 20 तारखेला मतदान करण्यास करू नका आळस, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी नागरिकांना केले.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तुळशी विवाह सोहळ्यातही मतदानाची टक्केवारी वाढविण्याची शक्कल लढविली जात आहे.
कामगार नेते सचिन लांडगे यांनी तुळशी विवाह निमित्त कोकणातून आलेल्या पारंपारिक दशावतार नाटक कलाकारांचे कौतुक केले. तुळशी विवाह झाल्यानंतर सर्व शुभकार्य सुरू होतात. या पुढील सर्व शुभ कार्य सर्वांच्या जीवनात घडोत अशा शुभेच्छा उपस्थितांना दिल्या. यावेळी भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे,पोपट हजारे, निलेश नेवाळे, संतोष ठाकूर, महादेव कवितके,हर्जीत बारडा, शुभम चीचोटे, मनीष चुडासमा, विलास गवत, विलास बागवे, विजय परम, प्रकाश भोसले, सुरेश कव्हर, विठ्ठल परम, नंदकिशोर सावंत, विश्वास राणे, मनाली पाताडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दारात तुळस, मंदिरावर कळस आणि 20 तारखेला मतदान करण्यास करू नका आळस’

भोसरीचे भाजप उमेदवार, आमदार महेश लांडगे यांचा हटके प्रचार सुरू असून दारात तुळस, मंदिरावर कळस आणि येत्या 20 तारखेला महेश लांडगे यांना मतदान करण्यास करू नका आळस, असे आवाहन अजय पाताडे यांनी नागरिकांना केले. महेश लांडगे यांच्यामुळेच भोसरी मतदारसंघाचा विकास झाला आहे. पूर्णानगर, घरकुल या भागात प्रशस्त रस्ते झाले आहेत. या विकास कामाच्या जोरावर आमदार लांडगे यांची हॅट्ट्रिक निश्चित आहे, असा विश्वास पाताडे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *