महाराष्ट्र 24- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन -दिः4/8/2020 -आज मंगळवार सकाळी 10:30 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पालीकेत मंजूर केलेल्या” ज्ञान जोती सावित्रीबाई फुले स्मारकाचे अंतर्गत डिझाईन व बाहेरील डिझाइन कसे राहील व सदर स्मारकात क्रांतीकारी फुले दांपत्यांचा इतिहास फुलेसृष्टी च्या रूपाने उभेउभ जशाचा तसाच कशा प्रकारे उभारता येईल या विषयी महानगरपालिके कडुन प्रेझेंटेशन दाखवण्यात आले सदर प्रेझेंटेशन च्या कार्यक्रम विद्यमान महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती चे सभापती श्री संतोष अण्णा लोंढे यांच्या उपस्थितीतत पार पडला.
पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने हाती घेतलेल्या हया ऐतिहासिक कामाचा आढावा घेऊन क्रांती सुर्य महात्मा फुले व ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा व फुलेसृष्टी कशी राहील या विषयी माहीती देण्यात आली. स्मारकापासून तमाम जनतेला शिक्षणा विषयी सामाजिक सुविधा कशा प्रकारे राहतील यांची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी महापौर माई ताई ढोरे यांनी ज्ञान क्रांतीकारी फुले दांपत्यांच्या महान कार्याविषयी उल्लेख करून गौरवोद्गार काढले व सदर कार्य लवकरात लवकर पुर्ण करण्या चा प्रयत्न करू असे आश्वासन दिले व स्थायी समिती चे सभापती श्री संतोष अण्णा लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर प्रसंगी उपस्थित मान्यवर :– माजी महापौर वैशाली ताई घोडेकर, प्रथम महीला महापौर डाॅ.अनीताताई फरांदे, समीतीचे प्रमुख श्री.मानवजी कांबळे, नगरसेविका सुवर्णा ताई बुरुडे, नगरसेविका रेखाताई दर्शले,श्री.योगेश भाऊ लोंढे ,समता परिषद पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर भुजबळ, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. आनंदा भाऊ कुदळे, बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रताप गुरव., कविता ताई खराडे, श्री. निलेशजी डोके, श्री. संतोष जोगदंड, श्री. गिरीश वाघमारे, श्री.सुरेश गायकवाड, श्री. हनुमंत माळी , श्री.अतुल क्षीरसागर व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.