महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ नोव्हेंबर ।। वास्तूशास्त्रात घरात सुख शांती राहण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. तसेच घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी याबद्दल सांगितले आहे. अनेक लोक घरात मोरपिस ठेवतात. मोरपिस हे भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. पण ते योग्य ठिकाणी न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया घरात मोरपिस कोणत्या टिकाणी ठवणे योग्य मानले जाते.
मोरपिस हे श्रीकृष्णाला खुप प्रिय आहे. भागवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर धारण करतात आणि हा त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. पण मोरपिस तुमचे नशीब देखील बदलू शकते. मोरपिस घरात ठेवल्याने अनेक समस्या दूर होतात.
आजार होतात दूर
मोरपिसे रोगांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जर सर्व उपाय करूनही आजार कमी होत नसेल तर आजाराशी संबंधित कागपत्रावर मध्यभागी मोरपिस ठेवावा. तांगले पिरणाम मिळतील.
घराचा हॉल किंवा किचन
घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा किचनमध्ये 11, 15 किंवा अधिक मोराची पिसे एकत्र ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संबंध सुधारतात आणि आपुलकी टिकून राहते. मोरपिस घरातील वातावरण स्वच्छ आणि चांगले ठेवण्यास मदत करते. ज्या ठिकाणी मोराची पिसे लावली आहेत त्या ठिकाणी किडे नसतात.
आर्थिक समस्या
आर्थिक समस्या असेल तर शुक्ल पक्षाच्या काळात आग्नेय कोपऱ्यात किमान 5 फूट उंचीवर दोन मोरपिसे लावावे. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. घरामध्ये कधीही तुटलेले मोरपिसे वापरू नका. असुभ परिणाम मिलू शकतात.
वैवाहिक जीवन आनंदी
घरात दोन मोरपिस एकत्र ठेवल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि नात्यात गोडवा वाढतो. घरातील नकारात्मक ऊर्जी दूर करायची असेल तर घराच्या जागेवर पाच मोरपिस ठेवावे. सकारात्मक ऊर्जा संचार करेल.
मोरपिसे वास्तु दोष दूर करतात. दाराच्या चौकटीवर बसलेल्या स्थितीत भगवान गणेशाची स्थापना करा आणि त्यावर तीन मोरपिसे ठेवा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.