महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे उमेदवार फहाद अहमद यांनी पराभवानंतर ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता; निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे.
ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती ९९ टक्के दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
अणुशक्तीनगर विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून फहाद अहमद हा निवडणूक लढत होते. त्यांच्याविरोधात सना मलिक होत्या.
सकाळी चार फेऱ्या सना मलिक आघाडीवर होत्या; पण त्यानंतर १७व्या फेरीपर्यंत फहाद अहमद हेच आघाडीवर होते. १८व्या आणि १९व्या फेरीत सना मलिक यांनी आघाडी घेत विजय मिळवला. ‘मी १७व्या फेरीपर्यंत आघाडीवर होतो.
परंतु १८व्या फेरीला ९९ टक्के चार्जिंग असलेल्या ईव्हीएम काढल्या. त्यामध्ये अचानक सना मलिक यांनी आघाडी घेतली. १९व्या फेरीत त्यांनी विजयी आघाडी घेतली,’ असे फहाद अहमद यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी, १७२ अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही सीयूएसमध्ये ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती ९९ टक्के दर्शविली गेली.