Maharashtra Chief Minister List : यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद ‘या’ नेत्यांनी भूषवलं, जाणून घ्या संपूर्ण यादी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार यश मिळालं आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मित्रपक्षांसह 236 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जाग मिळाल्या आहेत. आता महायुतीच्या नव्या सरकारचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु आहेत. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी:

1. यशवंतराव बळवंतराव चव्हण – 1 मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव सांबशिव कन्नमवार -21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. परशुराम कृष्णाजी सावंत (हंगामी) 25 नोव्हेंबर 1963 ते 04 डिसेंबर 1963

4. वसंतराव फुलसिंग नाईक- 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

5. शंकरवर भाऊराव चव्हाण – 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

6. वसंतराव बंडुजी पाटील – 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978

7. वसंतराव बंडुजी पाटील – 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978

8. शरदचंद्र गोविंदराव पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

9. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले -9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

10. बाबासाहेब अनंतराव भोसले – 20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

11. वसंतराव बंडूजी पाटील- 02 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985

12. वसंतराव बंडूजी पाटील- 10 मार्च 1985 ते 1 जून 1985

13. शिवाजीराव भाऊराव पाटील- निलंगेकर -03 जून 1985 ते 7 मर्च 1986

14. शंकरराव भाऊराव चव्हाण – 14 मार्च 1986 ते 24 जून 1988

15. शरदचंद्र गोविंदराव पवार -25 जून 1988 ते 3 मार्च 1990

16. शरदचंद्र गोविंदराव पवार -04 मार्च 1990 ते 25 जून 1991

17. सुधाकरराव राजूसिंग नाईक – 25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993

18. शरदचंद्र गोविंदराव पवार -06 मार्च 1993 ते 13 मार्च 1995

19. मनोहर गजानन जोशी -14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999

20. नारायण तातू राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

21. विलासराव दगडोजी देशमुख -18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

22. सुशिलकुमार संभाजीराव शिंदे – 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004

23. विलासराव दगडोजीराव देशमुख -1 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008

24. अशोक शंकरराव चव्हाण -8 डिसेंबर 2008 ते 8 नोव्हेंबर 2009

25.अशोक शंकरराव चव्हाण – 1 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010

26. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण – 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014

27. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

28. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस – 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019

29.उद्धव बाळासाहेब ठाकरे – 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022

30. एकनाथ संभाजीराव शिंदे- 30 जून 2022 पासून कार्यरत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *