डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला देदीप्यमान यश मिळालं असून तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी थेट ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन हा निकाला अविश्वसनीय आणि अनपेक्षित असल्याचं म्हटंल. तसेच, ईव्हीएमबाबत अभ्यास करुन भाष्य करू, असेही त्यांनी म्हटलं.

यंदाच्या निवडणुकीत मनसे, वंचितसह अनेक अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. विशेष म्हणजे मनसेच्या जवळपास 100 उमदेवारांचे डिपॉझिट जप्त झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हा निकाल अविश्वसनीय असल्याचं म्हटलं होतं.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी 10 हजार रुपये डिपॉझिट भरणे अनिवार्य होते. जर उमेदवाराने मतदारसंघातील एकूण मतांच्या तुलनेत 1/6 मतदान घेणे आवश्यक आहे.

म्हणजेच, विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख मतदान झाले असल्यास 1/6 म्हणजेच 16.33 टक्के मतदन उमेदवाराने घेणे गरजेचे आहे. याचा अर्थ 2 लाख मतदान झालं असल्यास 32,600 मतदान उमेदवारास मिळणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याचे डिपॉझिट जप्त होऊ शकते.

दरम्यान, जे उमेदवार 1/6 मतदानाचा टक्का पार करतात, म्हणजेच 16.33 टक्के मतदान प्राप्त करतील, त्यांना त्यांची डिपॉझिट रक्कम नियमानुसार परत मिळते.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवताना लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार, प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे नियमानुसार अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *