यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची व पालकांची धाकधूक वाढली ; दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ६ ऑगस्ट – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा फेरपरीक्षाचा निर्णय मंडळाकडून अद्याप घेण्यात आला नाही. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची व पालकांची धाकधूक वाढली असून त्यांचे यंदाचे वर्ष वाया जाणार की काय अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढवल्यामुळे मंडळाला निर्णय घेण्यास उशिरा लागत असल्याची माहिती पुढे येत असली तरी यासंदर्भात मंडळाने निर्णय लवकर जाहीर करावा अशी मागणी शिक्षक, पालक करत आहेत. कोरोनाचा संसर्ग पाहता, आॅगस्ट महिन्यातही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. शाळा व शैक्षणिक संस्था या कालावधीत बंदच राहणार आहेत. त्यामुळे निकालानंतर लगेचच आॅगस्टमध्ये ही परीक्षा घेणे शक्य नाही. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकातही या परीक्षांबाबत उल्लेख केलेला नाही. एकीकडे आॅनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत.

एकीकडे अकरावी प्रवेशप्रक्रिया तर दुसरीकडे बारावीनंतरच्या पदवी प्रवेशप्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. या प्रवेशप्रक्रिया पार पडण्याच्या आत फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर न झाल्यास आणि परीक्षांना लेटमार्क लागला तर उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहेत. हीच भीती पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातही आहे. यंदा दहावीचा राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असून परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजार ९९८ इतकी आहे, तर बारावीचा राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून राज्यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३१ हजार ९७५ इतकी आहे.

एकीकडे अकरावी प्रवेशप्रक्रिया तर दुसरीकडे बारावीनंतरच्या पदवी प्रवेशप्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. या प्रवेशप्रक्रिया पार पडण्याच्या आत फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर न झाल्यास आणि परीक्षांना लेटमार्क लागला तर उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *