महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आहेत. देशातील विविध राज्यांमध्येही योजना राबवण्यात आल्या आहेत.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०००० रुपये मिळतात.
ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला १० हजार रुपये दिले जाणार आहेत. (Subhadra Yojana)
या महिलांना मिळणार १० हजार रुपये (Subhadra Yojana Eligibility)
ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ मिळणार आहे ज्या राज्याच्या मूळ रहिवासी आहेत. २१ ते ६० वयोगटातील महिला सुभद्रा योजनेसाठी ात्र असणार आहेत. तसेच ज्या महिलांच्या नावावर राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम किंवा राज्य सुरक्षा खाद्य अधिनियमअंतर्गत जारी करण्यात आलेल्या रेशन कार्डमध्ये असेल. अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत १० हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा? (Subhadra Yojana Application Process)
सुभद्रा योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://subhadra.odisha.gov.in/ या साइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील अर्ज करु शकतात. स्थानिक संस्था कार्यालय, अंगनवाडीत जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.