![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक वाढत असल्याने त्यांच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र, लसूण व शेवग्याच्या आवकमध्ये घट झाल्याने लसूण ४८०, तर शेवगा ४०० रुपये किलोने विक्री होत आहे.
थंडीचा कडाका सुरू होताच भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील 15 दिवसांत भाजीपाल्याने 120 ते 1४0 रुपये किलोची पातळी गाठली होती. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबरच्या मध्यावर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आवक घटल्याने दरात सातत्याने वाढ होत होती. 80 रुपये किलोने विकले जाणारे वांगे, गिलके, कारले, दोडके 120 ते 1४0 च्या घरात पोहोचल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, आता भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण असल्याने त्यांचे चांगले उत्पादन होत आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही वाढत असल्याने दरात घट होत आहे.
दर आणखी घटण्याची शक्यता
विधानसभा निवडणूक प्रचारामुळे शेतमजूर मिळेनासे झाले होते. त्यामुळे पीक काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली होती. मात्र आता निवडणूक संपल्याने शेतमजूर उपलब्ध झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक सतत होत आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. पुढील महिनाभर आवक सतत सुरू राहणार असल्याने दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाज्या – दर (किलो / नग)
शेवगा – ३२० ते ४00
कोबी – 30
फ्लॉवर – ४0
लसूण – ४८0
लाल कांदा – ६0
कारले – ८0
दोडके – ८0
गिलके – ८0
भेंडी – 80 ते १००
कोथिंबीर – ६०
मेथी – ३0
मिरच्या – १००
ढोबळी – ८0
गवार – १६०

