महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। लोकांना मोफत धान्य वाटप कधीपर्यंत करणार असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला आहे. त्यापेक्षा सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही, असा प्रश्नही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारत फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत रेशन वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न पुरवठा करण्यासंबंधी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. याचवेळी कोर्टाने केंद्र सरकारवर तिखट सवाल उपस्थित केला. गरिबांना फक्त मोफत रेशन देत राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चांगलंच फटकारलं. आता केंद्र सरकार या प्रश्नावर काय उत्तर देईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.