महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। जगभरात बुधवारी रात्री मेटाचे सर्व्हर डाऊन झाल्याने मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. भारतात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मेटा प्लॅटफॉर्म्सबाबत तक्रारी येण्यास सुरूवात झाली.
युजर्सना व्हॉट्सअॅपवर मेसेजे पाठवण्यास तसेच मिळण्यास अडचण येत होती. याचपद्धतीने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेडवरही फीड अपलोड मिळण्यास अडचण येत होती. व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड यांचे स्वामित्वही मेटाजवळ आहे.
या चारही लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सना साधारण तासाभराहून अधिक काळ अडचणींचा सामना करावा लागला. साधारण रात्री २ वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स कोणत्याही अडचणींशिवाय सुरू झाले.
या अडचणीमुळे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मीम्सचा पूर आला होता. युजर्स एलन मस्कचे स्वामित्व असलेल्या ट्विटवरवर या गोष्टीबाबत चर्चा करत होते. मेटा डाऊन आणि मार्क झुकरबर्गही एक्सवर ट्रेंड करत होते. युजर्स मीम्स, व्हिडिओच्या माध्यमातून मेटा आणि झुकरबर्गला ट्रोल करत होते.