School Timing: राज्यात 13 जून ऐवजी 1 एप्रिलला भरणार शाळा ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। राज्यात आता शाळेची घंटा 1 एप्रिल पासून वाजणारेय. ऐरव्ही 13 जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून 1 एप्रिल भरवण्याचा निर्णय सूकाणू समितीनं घेतलाय. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलीये. नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतूदी आहेत पाहु या.

नव्या अभ्यासक्रमात कोणते नवे बदल?
तासिका आता 45 मिनिटांऐवजी 50 मिनिटांच्या असतील

सीबीएसईप्रमाणेच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात असेल

गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल

दहावी-बारावी बोर्ड परिक्षेची रचना बदलणार, वर्षांतून दोन परिक्षा होणार

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याची 10 दिवस दफ्तराविना शाळा

विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी

विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक अध्ययन पद्धत

कोअर कमिटीनं राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करत हे मोठे निर्णय जरी घेतले असले तरी शासन आदेशानंतरच त्याची अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे सरकार एप्रिल-मेच्या भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *