Pune Crime : पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। पुण्यामध्ये सेक्स एस्कॉर्टच्या नावाखाली एका तरुणाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. बदनामीच्या भीतीने तरुणाने सायबर चोरट्यांना तब्बल ७८ हजार रुपये दिलेत. पुण्यातील विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाशी २ तरुणांनी मोबाईलवर संपर्क साधला. पंकज भदौरिया आणि जगदीश नावाच्या आरोपींनी या तरुणाला त्याचेच मॉर्फ केलेले अश्लील फोटो टेलिग्रामवर पाठवले.

त्यानंतर हेच फोटो तुझ्या आई-वडिलांना पाठवू अशी धमकी या तरुणाला देण्यात आली. त्यानंतर तरुणाच्या व्हॉटसअपवर क्यूआर कोड पाठवला. आरोपींनी तरुणाला सेक्स एस्कॉर्टची सेवा घेतल्याचे सांगितले. ती सेवा रद्द करायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे धमकावले. त्यामुळे भीतीपोटी त्या तरुणाने घाबरून आरोपींना ७८ हजार रुपये पाठवले.

घरातून एवढे पैसे गेल्यानंतर तरुणाच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर घडलेला प्रकार त्याने सांगितला. आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात २ तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दोन दिवसांपूर्वी अशीच घटना उघडकीस आली. पॉर्न साईट पाहिली म्हणून अनेक जणांना धमकीचे मेल आलेत. आतापर्यंत शेकडो जणांना असे मेल प्राप्त झाले असून सायबर गुन्हेगारांनी ब्लॅकमेलिंग केल्याचही पोलीस तपासात समोर आलंय.

मात्र कुणीही अशा धमकीच्या इमेल्सला घाबरून पैसे देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तुम्ही केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉर्न साईट्स पाहत असून केंद्र सरकारच्या तांत्रिक तपासा तुम्ही कैद झाला आहात. अशा स्वरूपाचे CBI चे एक बनावट वॉरंट आणि समन्स असलेला एक मेल प्राप्त होत आहे. मात्र सायबर पोलिसांनी याची चौकशी केली असता हे बनावट मेल असल्याच तपासात समजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *