नंबर सेव्ह न करता ही करू शकता व्हॉट्सॲप कॉल ; आले कॉलिंगसाठी नवीन फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। व्हॉट्सॲप कॉलिंगसाठी आणखी एक नवीन फीचर आणत आहे. ‘व्हॉट्सॲप न्यू इन-ॲप कॉल डायलर’ असे नवीन फीचरचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲप बीटा Android 2.24.26.11 मध्ये बीटा वापरकर्त्यांना अज्ञात फोन नंबरवर कॉल करण्यासाठी एक नवीन डायलर उपलब्ध करून देण्यात आला होता. यासाठी ॲपमध्ये ‘कॉल अ नंबर’चा पर्याय देण्यात आला आहे. आता कंपनी व्हॉट्सॲप बीटा iOS 24.25.10.76 मध्ये हे फीचर देण्याची तयारी करत आहे. WABetaInfo ने ही माहिती दिली आहे.


WABetaInfo ने नव्या फिचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही हे फिचर पाहू शकता. कंपनीने मेनूमध्ये एक एंट्री पॉइंट दिला आहे. ज्याद्वारे वापरकर्ते कॉलसाठी संपर्क क्रमांक निवडू शकतात. या सेक्शनमध्ये युजरला डायलर उघडण्याचा पर्याय मिळेल. येथे वापरकर्ते फोन नंबर टाकून कॉल करू शकतात. नंबर टाकल्यानंतर व्हॉट्सॲप नंबर व्हॉट्सॲपवर नोंदणीकृत आहे की नाही याची पडताळणी करते. पडताळणी यशस्वी झाल्यास वापरकर्त्याला निळा पडताळणी चेकमार्क दिसेल. ॲपमधील डायलरमधून संपर्क सूचीमध्ये नंबर सेव्ह न करता कॉल करता येतो. एकदाच कॉलिंगसाठी हे एक उत्तम फिचर आहे. कंपनी आता WhatsApp Beta iOS मध्ये देखील हे फीचर देत आहे. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *