महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील अॅक्शन पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. पर्थ आणि ॲडलेडनंतर आता ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना रंगला आहे. आजपासून पाच कसोटींच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी आणि हवामान पाहता वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. 4 वर्षांपूर्वी गाबा मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा त्याच यशाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे आणि टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी येथे विजय आवश्यक आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
भारताने नाणेफेक जिंकली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. अश्विन आणि हर्षित राणा यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि आकाश दीप संघात परतले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघात एक बदल करण्यात आला आहे. स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे.