हिवाळ्यात सर्दी-खोकला का वाढतो? जाणून घ्या, थंड हवा आणि व्हायरसमधील खतरनाक कनेक्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। हिवाळा सुरू होताच सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. पण थंड हवेमुळे खरोखरच आपण आजारी पडतो का? रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, थंड हवामानामुळे सर्दी होत नाही, परंतु व्हायरसचा प्रसार करण्यामध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते.

हिवाळ्यात, सर्दी आणि खोकल्यासाठी जबाबदार असलेले व्हायरस, जसं की रायनोव्हायरस, इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा धोका वाढतो. थंड आणि कोरडी हवा हे व्हायरस दीर्घकाळ एक्टिव्ह आणि संसर्गजन्य ठेवतात. उदाहरणार्थ, अशा परिस्थितीत इन्फ्लूएंझा व्हायरस हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरण्यास मदत होते.

थंड हवामानात लोक त्यांचा बराचसा वेळ घरात घालवतात. सततच्या संपर्कामुळे आणि हवेशीर नसलेल्या जागेत राहिल्यामुळे श्वसनासंबंधित असलेले अनेक व्हायरस हे वेगाने पसरतात. शिंकण्याचे आणि खोकल्याचे थेंब कोरड्या हवेत लवकर पसरतात आणि लहान कणांमध्ये बदलतात, जे जास्त काळ हवेत राहू शकतात आणि दूरपर्यंत पसरतात.

थंड हवेचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. थंड हवा श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, ज्यामुळे व्हायरस पसरणं सोपं होतं. या कारणास्तव, हिवाळ्यात नाक आणि तोंड स्कार्फने झाकण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपण श्वास घेत असलेली हवा उबदार असेल.

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी झाल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. याशिवाय, थंडीमुळे शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. त्यामुळेच थंडीच्या दिवसांत जास्त काळजी घेण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *