महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक निरनिराळ्या योजना राबवत असते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील करोडो लोकांना मिळत असतो. सरकार लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार योजना आणते. स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र असे असूनही अनेकांना, त्यांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्ने पूर्ण करता येत नाही. आजही देशातील अनेक लोक कच्च्या घरात राहतात.भारत सरकार अशा लोकांना त्यांचे कर निश्चित करण्यात मदत करते. याच धर्तीवर सरकारने सन २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार गरजूंना कायमस्वरूपी पक्की घरे मिळवून देण्यासाठी मदत करते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ मिळू शकतो का? याबाबत योजनेचे नियम काय आहेत? असा प्रश्नही अनेकांच्या मनात येतो. आज आपण या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. आणि जाणून घेणार आहोत कि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? शिवाय एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना या योजनेचा कसा लाभ घेता येईल? चला तर मग, जाणून घेऊ प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठीचे पात्रता निकष.
ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्यांचे स्वतःचे घर नाही किंवा जे कच्चा घरात राहतात त्या लोकांना आयुष्मान योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. पण जर एका कुटुंबातील दोन व्यक्ती एकत्र एकाच छताखाली राहत असतील तर त्यापैकी एकालाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकतो.कारण योजनेच्या नियमांतर्गत कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जसे की वडील आणि मुलगा एकत्र राहत असतील तर पिता किंवा पुत्र यांच्यातील एकालाच लाभ मिळू शकतो. परंतु, जर एकाच कुटुंबातील दोन लोक वेगळे राहत असतील आणि दोघांची शिधापत्रिका वेगवेगळी आहेल तर अशा परिस्थितीत एकाच कुटुंबातील दोघांनाही लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक अटींचीही पूर्तता करावी लागणार आहे.