१९ वर्षीय तरुण विराटशी नडला; सामन्यातील कोहलीसोबतच्या वादावर सॅम काय म्हणाला ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला रोमांचक सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपल्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन दाखवण्यास सुरु केले. ऑस्ट्रेलियाकडून आज सॅम कॉन्स्टासने पदार्पण केले तर या पदार्पणाच्या सामन्यात त्याने बुमराह आणि विराटशी चांगलाच पंगा घेतलेला दिसला.

सॅमने पदार्पणाच्या सामन्यात चौकार आणि षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. सॅमने बुमराहला निर्भयपणे खेळत स्फोटक फलंदाजी केली. यादरम्यान, त्याने विराटशी पंगा घेतला म्हणजेच दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. आता १९ वर्षीय तरुण कॉस्टन्सने मेलबर्न कसोटीच्या मध्यावर या घटनेवर आपले मौन सोडले आहे.

काय होतं प्रकरण?
१९ वर्षीय युवा खेळाडू सॅम कॉन्स्टासने मेलबर्नमध्ये शानदार शैलीत पदार्पण केले. त्याने बुमराहसह भारतीय गोलंदाजांना खडे बोल सुनावले. १०व्या आणि ११व्या षटकांदरम्यान, विराट कोहली बॉल घेऊन कॉन्स्टासकडे गेला आणि त्याच्या खांद्याला धक्का दिला. यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली पण ती फार वेळ चालली नाही. उस्मान ख्वाजा आणि अंपायतच्या मध्यस्थीने हा वाद तिथेच थांबला. यानंतर कोहलीवर सोशल मीडियावर टीकाही झाली. मात्र, युवा खेळाडूने हा मुद्दा मागे ठेवला आहे.

कॉन्स्टास काय म्हणाले?
विराटच्या स्लेजिंगवर कॉन्स्टास म्हणाला, “मैदानावर जे काही झालं ते तिथेच राहू दे.” बुमराहला या तरुण खेळाडूने षटकार ठोकले आणि रेकाॅर्डब्रेक कामगिरी केली. याशिवाय जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबद्दलही म्हणाला,”मी त्याला टार्गेट करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो.”

पदार्पणाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला
कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून कसोटी पदार्पणाचा पहिला दिवस संस्मरणीय बनवला. त्याने ६५ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६० धावांची दमदार खेळी केली. पण टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या शानदार चेंडूला बळी पडला. ड्रेसिंग रूममध्ये कॉन्स्टासचे भव्य शैलीत स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *