सेल लागताच चीनच्या फोनची तुफान खरेदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ११ ऑगस्ट – फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये चीनचे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सची जोरदार विक्री झाली आहे. भारत-चीन सीमा वादानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत होती. पण या ऑनलाइन ऑफर्सने भारतीय ग्राहकांना एवढं आकर्षिक केलंय की आत्मनिर्भरचा नाराही कुणाच्या लक्षात राहिला नाही. आत्मनिर्भरचा नारा दिल्यामुळे चीनच्या कंपन्यांनाही चिंता होती. पण याउलट घडलं आणि फोनच्या विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे.

रिअलमी इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या कालावधीच विक्रीत मोठी वाढ झाली. एकूण व्यापारी मूल्य हे ४०० कोटींच्या आसपा असण्याची शक्यता आहे. कंपनीचा वायर्ड इयरफोन हे सर्वाधिक विकलं गेलेलं प्रोडक्ट ठरलं, तर इतर वर्क फ्रॉम होमची प्रोडक्टही मोठ्या प्रमाणात विकली गेल्याचं कंपनीने सांगितलं.

शाओमीच्या चार फोनचेही हजारो मॉडल्स विकले गेले आहेत. तेही काही सेकंदात हे फोन विकले गेले असल्याचं कंपनीने सांगितलं. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. चीनचे ब्रँड असलेले अनेक फोन या सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. याशिवाय ऑफलाइन विक्रीतही वाढ झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. काऊंटरपॉईंटच्या रिसर्चनुसार भारतीय बाजारात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचा हिस्सा जानेवारी-मार्चमध्ये ८१ टक्के होता, जो ७२ टक्क्यांवर घसरला आहे.

टीसीएल इंडियाचे मॅनेजर माईक चेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीचे 4K आणि QLED टीव्ही मॉडल फ्लिपकार्टवर अर्ध्या दिवसातच विकले गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता यावर्षीच्या जूनमध्ये ४७ टक्के, तर जुलैमध्ये विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे. या वर्षातील पहिल्या ६ महिन्यात टीसीएलच्या विक्रीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचंही चेन यांनी सांगितलं.

एका नामांकीत चीन कंपनीच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली की, भारतीयांना योग्य किंमतीत लेटेस्ट तंत्रज्ञान हवं आहे. त्यामुळेच या वस्तूंची लोकप्रियता कायम आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, चीनचे ब्रँड फक्त ऑनलाइनच नव्हे, तर ऑफलाइनही आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. चीनच्या फोन विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं एका अधिकाऱ्याने ईटीला सांगितलं.

खरं तर मागणीपेक्षा पुरवठा हा मोठा मुद्दा आहे. फोनचा पुरवठा जास्त असता तर व्यवसायही जास्त झाला असता. चीनच्या ब्रँडला एवढा व्यवसाय होईल याची खात्री नव्हती आणि कस्टम क्लिअरन्स, कंपन्यांमधील सोशल डिस्टन्सिंग या अटींमुळे जून, जुलै महिन्यात फोनची निर्मितीही कमी झाली होती. त्यामुळे मागणी हा मुद्दाच नाही. पुरवठा हा मुद्दा होता, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *