महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। लोणावळ्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगवेगळे स्पॉट आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र थर्टी फार्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा येथील टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हि बंदी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी असे दोन दिवस पर्यटकांना बंदी असेल. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. या अनुषंगाने पार्टीचे नियोजन देखील करण्यात येत असते. तर काही जण फिरण्याचा बेत आखत असतात. यात लोणावळा हे उत्तम असे ठिकाण मानले जाते. यामुळे थर्टी फर्स्टला बहुतेकजण लोणावळा येथे फिरण्यासाठी जात असतात. परिणामी याठिकाणी मोठी गर्दी देखील होत असते. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यात मोठी गर्दी करतात. टायगर पॉइंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२५ दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिले आहेत.
पर्यटकांचा होणार हिरमोड
लोणावळा येथील टायगर पॉईंट व लायन्स पॉईंट हे सन सेट पाहण्यासाठी चांगले ठिकाण आहे. यामुळे दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. दोन दिवस बंदी घालण्यात आल्याने यंदा ३१ डिसेंबरचा सन सेट पर्यटकांना पाहता येणार नाही.