महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात सहावा हप्ता जमा झाला आहे. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत. संक्रातीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रात गोड होणार आहे. दरम्यान,याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana News)
महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना लवकरच २१०० रुपये मिळणार आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल. त्यानंतर महिलांना २१०० रुपये जमा केले जाणार आहेत. (Ladki Bahin Yojana Jaunuary Installment)
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकउंट लिंक करुन घेण्यास सांगितले आहे.