Ration Card Rule : तर रेशन कार्ड होणार रद्द ; १ जानेवारीपासून नियमात बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। नवीन वर्ष सुरु होणार आहे.नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. नवीन वर्षात रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन वर्षात रेशन कार्डबाबत काही नियम बदलणार आहेत. (Ration Card Rule Change)

भारत सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टअंतर्गत रेशन कमी किमतीत मिळणार आहेत. रेशन कार्डवर तुम्हाला कमी किमतीत धान्य मिळणार आहेत. देशातील जवळपास ८० कोटी लोकांकडे रेशन कार्ड आहेत. रेशन कार्डचे नियम नवीन वर्षात बदलणार आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांवर परिणाम होणार आहे. (Ration Card Rule Change From New Year)

या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द

सरकारकडून रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य सांगितले आहे. ज्या नागरिकांनी ई-केवायसी केले नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायचे आहे.

जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. १ जानेवारीपासून तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. त्यामुळे रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आजचा एकच दिवस आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी झाले नाही तर तुम्हाला ते जवळील रेशन कार्ड दुकानावर जाऊन करावे लागेल. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानावर जाऊन आधार कार्ड द्यावे लागेल. त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल. त्यानंतर मोबाईलच्या मदतीने ई-केवायसी करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *