LPG Price : वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जानेवारी रोहित व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. एकप्रकारे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळालेय. एक जानेवारीपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. मागली पाचव्या महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. पण सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

नववर्षानिमित्त देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 14.50 रुपयांची घट झाली आहे. 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १४.५० रूपये कपात करण्यात आली आहे. तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली. IOCL च्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीमध्ये आजपासून व्यावसियाक सिलिंडर 1804 रुपयांना मिळणार आहे, याआधी 1818.50 रुपयांना मिळत होता. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १७५६ रूपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये १ जानेवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९११ रुपये झाली. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६ रुपयांनी कमी झाली. मुंबईतील सिलिंडरची किंमत १५ रुपयांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये १७७१ रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७५६ रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये १९ किलोचा सिलेंडर १९६६ रूपयांना मिळेल.

 

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही –
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *