Whatsapp: जुने स्मार्टफोन युजर्सना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही, नवीन फोनची गरज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। नववर्षाच्या सुरुवातीला, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) काही जुन्या स्मार्टफोनसाठी अॅप सपोर्ट बंद करत आहे. यामुळे अशा स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल. नवीन मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी WhatsApp ने जुन्या उपकरणांवरील समर्थन समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात सुमारे दोन अब्ज वापरकर्त्यांसह लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सॲपचा भारतात मोठा वापरकर्ता वर्ग आहे. १ जानेवारी २०२५ पासून, २० हून अधिक Android फोनसाठी व्हॉट्सअॅप समर्थन समाप्त होत आहे. याचे कारण या फोनमध्ये जुन्या Android ४.४ Kitkat किंवा त्यापेक्षा जुन्या सॉफ्टवेअर आवृत्त्या आहेत, ज्यामुळे वापरकर्ते चॅटिंग करू शकणार नाहीत.

HDblog च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने (Meta) अनेक जुन्या उपकरणांसाठी ॲप समर्थन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील उद्देश इतर वापरकर्त्यांना अधिक चांगली सुरक्षा आणि कार्यक्षमता प्रदान करणे आहे. समर्थन संपलेल्या उपकरणांची यादी पाहिली तर लक्षात येते की हे फोन एक दशकापूर्वी लॉन्च झाले होते.

त्यामुळे अशा उपकरणांना दीर्घ काळापासून कोणतेही सॉफ्टवेअर अद्यतने मिळालेली नाहीत. नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी Meta ने हा निर्णय घेतला आहे. जुने फोन वापरणाऱ्यांना यामुळे व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन स्मार्टफोन घेण्याची आवश्यकता भासणार आहे.

पाहा कोणच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही

Samsung

Galaxy S3

Galaxy Note 2

Galaxy Ace 3

Galaxy S4 Mini

Motorola

Moto G (1st Gen)

Motorola Razr HD

Moto E 2014

HTC

One X

One X+

Desire 500

Desire 601

LG

Optimus G

Nexus 4

G2 Mini

L90

Sony

Xperia Z

Xperia SP

Xperia T

Xperia V

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *