महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे : सोने दरात सात महिन्यानंतर प्रथमच दोन ते अडीच हजारांची घसरण झाली. सोमवारी जीएसटीसह प्रतितोळा 55 हजार 600 रुपयांवर असणारे सोने मंगळवारी 53 हजार 200 रुपयांवर आले.
गेल्या सात महिन्यांपासून सोने व चांदी दरात सतत वाढ होत आली आहे. जानेवारी महिन्यात 42 हजार रुपये प्रतितोळा असणारा सोन्याचा दर वाढत गेला. गेल्या महिन्यात हा दर 50 हजारांवर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्यातील गुंतवणूक वाढल्याने सोने दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञाचे मत होते; पण ही गुंतवणूक कमी झाल्याने सोने व चांदी दरात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.