Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान म्हणाले ………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावीत अशी ईच्छा व्यक्त केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या, आशाताई पवार यांच्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनीही मोठं विधान केले. ‘अजित पवार यांच्या मातोश्रींनी भावना व्यक्त केली, कौटुंबिक भावनेतून व्यक्त केली असेल. मी या आधीही सोप समीकरण सांगितलं आहे. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, याचा विचार करुन शरद पवार निर्णय घेतली, असे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. या विधानामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार या चर्चा सुरू झाल्या आहेत.

“सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं हीत कशात आहे. ही भावना लक्षात घेणे महत्वाचे आहे, यावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील. राज्यात अजित पवार यांच्या पक्षाला एकुण मिळालेल्या मतदानाचे ९ टक्के मिळाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला ११.७६ टक्के मिळाले आहे. यात जागा वेगवेगळ्या लढवल्या ही गोष्ट आहे. या मिळालेल्या मतदारांची आपण किंमत करणार आहे की नाही? या मतदारांनी काहीतरी विचार केला असेल की नाही? विचारांची बांधीलकी जपली पाहिजे, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर लोकांचा रोष आहे. लक्षात घेतला पाहिजे. वाईट पद्धतीने हत्या झाली आहे. या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे. एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पाउलं उचलली पाहिजेत, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

“निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. पोलिस ठाण्यात बेड का आले आहेत? याची चौकशी केली पाहिजे. गुन्हेगारांना व्हिआयपी ट्रिटमेंट बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, असं कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *