Rohit Sharma: मी कुठेही……. रोहित शर्माने निवृत्तीबाबत सोडले मौन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। रोहित शर्माने(Rohit Sharma) bum सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवृत्तिबाबतचे मौन सोडले आहे. खराब फॉर्मशी लढणाऱ्या रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. यानंतर अशी चर्चा सुरू झाली की हिटमॅन आता निवृत्ती जाहीर करेल. तसेच या मालिकेनंतर तो कसोटी फॉरमॅटला बाय बाय म्हणू शकतो. आता रोहितने आपल्या निवृत्तीबाबत आश्चर्यजनक विधान केले आहे.

सिडनी कसोटी सुरू असतानाच रोहितने आपल्याकडून स्पष्ट केले की त्याचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही. तो सध्या निवृत्त होण्याबाबत विचार करत नाहीये. म्हणजेच हिटमॅनने स्पष्ट केले आहे की तो रिटायरमेंट घेणार नाहीये. तसेच रोहितने आपल्या पुनरागमनाबाबतही आशा व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला मी लवकरच फॉर्मात येईन.

रोहितने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रानंतर सांगितले, बाहेर लॅपटॉप, पेन आणि पेपर घेऊन बसलेले लोक हे नाही ठरवू शकत की निवृत्ती कधी येईल आणि मला काय निर्णय घेतला पाहिजे. सिडनी कसोटीतून वगळल्यानंतर समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की रोहितला सिलेक्टर्सकडून सांगण्यात आले आहे की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर तो टीम इंडियाचा भाग असणार नाही. दरम्यान, रोहितने त्याच्या उलट विधान केले आहे. आता भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर काय होते हे पाहावे लागेल.

सिडनी कसोटीत बुमराहचे नेतृत्व
सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळल्यानंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे ज्यात बुमराह भारताचे नेतृत्व करतोय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *