महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। बेकायदेशीर धंदे, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावणाऱ्या टोळक्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘वॉर्निंग’ दिली आहे. कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ. असा सज्जड दम देखील त्यांनी गुंडांना दिला आहे. पोलीस आयुक्तांनी हा थेट इशारा एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान दिला आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, पुणे शहराच्या वतीनं किमती मुद्देमाल वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी दमदार भाषण दिलं. तसेच भाषणादरम्यान आयुक्तांनी गुन्हेगारी प्रकरणाला आळा घालण्यासाठी गँगस्टर गुंडांना वॉर्निंग दिली आहे. कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
भाषणावेळी, ‘कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ’. असा थेट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस ठाण्यातील बऱ्याच वर्षांपासून पडलेल्या बेवारस मुद्देमालांसदर्भात देखील पोलीस आयुक्त कुमार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात गुन्हेगारांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच हत्या, यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर येत योग्य सुचना दिल्या होत्या. अशातच एका कार्यक्रमात त्यांनी गुन्हेगारी विश्वाला आळा घालण्यासाठी सज्जड दम देत, गुंडांना इशारा दिला आहे.