महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। उत्तर भारतातून दक्षिणकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सोमवारी मुंबईत १३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा १२ अंशाच्याही खाली आहे. पुढचे दोन तीन दिवस आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा हळूहळू वाढणार आहे. सोमवारी पुण्यात १३.८ अंश तापमानाची नोंद झाली. तर नाशिकमध्ये १४.७, कोल्हापूरमध्ये १६.१, सोलापूरमध्ये १७.२ आणि साताऱ्यात १२.८ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे.
विदर्भातही पारा काही भागात १२ अंशापर्यंत खाली आहे. सोमवारी अकोल्यात १५.९ अंश तापमानाची नोंद झाली. तर अमरावतीत ११.९ अंश तापमान नोंवदण्यात आलं आहे. याशिवाय भंडाऱ्यात १३.०, बुलडाणा १७.५ , ब्रह्मपुरी १२.०, गडचिरोली १२.०, गोंदिया ११.४, नागपूर ११.२, वर्धा ११.९, वाशीम १६.२ आणि यवतमाळमध्ये १५.४ अंश तापमानाची नोंद झाली.
महत्त्वाचे म्हणजे राज्यात एकीकडे थंडीचा कडका वाढत असताना अवकाळी पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गारठ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील मराठावाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? ( अंश सेल्सिअयमध्ये )
पुणे – १३.८
अहिल्यानगर -१२.३
धुळे- १०.४
जळगाव- ११.०
जेऊर- ११.०
कोल्हापूर- १६.१
महाबळेश्वर- १४.७
मालेगाव- १४.४
नाशिक- १४.७
निफाड- १०.५
सांगली- १३.६
सातारा- १२.८
सोलापूर- १७.२
सांताक्रूझ- १६.८
डहाणू- १७.८
रत्नागिरी- १७.५
छत्रपती संभाजीनगर- १५.६
धाराशिव- ११.८
परभणी- ११.५
परभणी ८.३
अकोला- १५.९
अमरावती- ११.९
भंडारा- १३.०
बुलडाणा- १७.५
ब्रह्मपुरी- १२.०
गडचिरोली- १२.०
गोंदिया- ११.४
नागपूर- ११.२
वर्धा- ११.९
वाशीम- १६.२
यवतमाळ- १५.४