महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। फिल्म इंडस्ट्री म्हटलं की अनेकांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. फक्त बॉलीवूडचं नाही तर आता टॉलिवूडमध्येही अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलाय. तेलगु सिनेमातील अनेक अभिनेत्रींनी या प्रकरणांवर आणि त्यांच्या अनुभवांवर वाचा फोडली आहे. तेलगु अभिनेत्री संध्या नायडूने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला.
तेलगु अभिनेत्री श्री रेड्डीने 2018 मध्ये कास्टिंग काऊचसंदर्भात मोठा प्रकार उघड केला होता. या सगळयाला विरोध करण्यासाठी तिने रस्त्यावर टॉपलेस होऊन निषेद दर्शवला होता. यानंतर आता अभिनेत्री संध्या नायडूने जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. “मला मिळालेल्या बहुतेक भूमिका काकू आणि आईच्या होत्या. त्यामुळे ते लोक दिवसा शूटिंग सेटवर मला अम्मा म्हणायचे आणि रात्री झोपायला बोलावायचे.” असे तिने एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.