महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशात आताच पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकूण सात आरोपींवर याप्रकरणी मकोका लावण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मकोका लावलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. तसेच वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आला नसल्याची माहिती आहे.