![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये आर्थिक मदत मिळते. महिला, शेतकरी ते स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना या योजनांमध्ये आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारच्या अशीच एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला ८०,००० रुपयांचे कर्ज मिळते.तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. केंद्र सरकारच्या या योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळते. बिझनेस सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कर्द देते. (PM Svanidhi Yojana)
कोरोना काळात ही पीएम स्वनिधी योजना सुरु केली होती. या योजनेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. पीएम स्वनिधी योजनेत तुम्हाला ८०,००० रुपये मिळतात. या योजनेत सर्वात आधी १०,००० रुपये दिले जातात. त्यानंतर २०,००० रुपये दिले जातात. यानंतर ५०,००० रुपये दिले जातात.
या योजनेत रस्त्यावरील भाजीविक्रेते, फळविक्रेते किंवा फास्ट फूड विक्रेते यांना कर्ज दिले जाते. या योजनेत तुम्ही सर्वप्रथम १०,००० रुपये मिळवू शकतात.हे १०,००० रुपये परत केल्यावर तुम्हाला परत २०,००० रुपयांचे लोन मिळणार आहे. यानंतर हे पैसे परत केल्यावर तुम्हाला ५०,००० रुपयांचे लोन मिळणार आहे.
पीएम स्वनिधी योजनेत घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्हाला १ वर्षाच्या आत परत करायची आहे. या योजनेत तुम्ही जर वेळेवर रक्कम परत केली तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे फक्त आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेत लोनच्या व्याजावर सरकार सब्सिडीदेखील देते.
