महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० जानेवारी ।। पिंपरी चिंचवडमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडलीय. दोन गुंडांनी दुचाकीवरून येत कंपनीजवळ अंदाधुंद गोळीबार केलाय. ही धक्कादायक घटना वराळे परिसरातील कैलास स्टील कंपनीमध्ये घडली असून, या अंदाधुंद गोळीबारात कंपनी सुपरवायझर गंभीर जखमी झालाय. पोटात गोळी लागल्यानं सुपरवायझर गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. गावगुंडांनी हा गोळीबार कंपनी मालकाकडे खंडणी मागण्यासाठी आणि कामगारांना घाबरवण्यासाठी केली असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महाळुंगे एमआयडीसीमध्ये कैलास स्टील कंपनीत २ हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. दोन आरोपी दुचाकीवरून आले. नंतर कैलास स्टील इंटरप्राईजेस या कंपनीत शिरले. दुचाकीवरून येताना त्यांनी बंदुक देखील सोबत ठेवली होती. दुचाकीवरून जात असताना, त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी २ राऊंड फायरिंग केले. या अंदाधुंद करण्यात आलेल्या गोळीबारात सुपरवायझर गंभीर जखमी झालाय.
सुपरवायझर याच्या पोटात गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी आहेत. हल्लेखोरांनी कंपनीत घुसून अचानक गोळबार केल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झालीय. तसेच कामगारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. गोळीबार झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढलाय.
हा अंदाधुंद गोळीबार कंपनी मालकाकडे खंडणी मागण्यासाठी, तसेच कामगारांना घाबरण्यासाठी हल्लेखोरांनी केला असल्याची माहिती समोर आलीय. स्थानिक गावगुंडांनी हा गोळीबार केला असावा असा पोलीस विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी, पोलिसांनी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी कलीय.