‘महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, तो…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलाय असं मी मानतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी ज्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून संस्था विकत घेणं त्यातून निवडणुका जिंकणं याला राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे वेश्येचं राजकारण म्हणायचे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेचं प्रकरण गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी पालकमंत्रपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, स्वत:ते उपमुख्यमंत्री आहेत, आता तेही राहणार नाहीत. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय तो त्यांच्याच पक्षातील आहे, याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही, घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. याचं वजन कुठे होतं. सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात ना तसे हे अमित शहांनी हवा भरलेले नेते आहेत. बाळासाहेबांनी यांना भरपूर दिलं, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय आहे?, असं म्हणत संजय राऊतांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी पुस्तक वाचलंय का? पेपरतरी वाचतो का हा माणूस? तुमच्यावरती मनगट चावायची वेळ येईल हे लक्षात घ्या. आम्ही तुमच्यासारखी लाचारी पत्करली आहे. महाराष्ट्राच्या शत्रूची लाचारी करणं म्हणजे अफजलखानाच्या दरबारामध्ये मुजरे झाडणं हे काम ते करत आहेत. तुम्ही तात्पुरते आहात, तु्म्हाला ज्यांनी पदे दिलीत तेच तुमची पदे काढून घेतील. तुमच्यातलेच कोणीतरी बसवतील, असं संजय राऊत म्हणाले.

मला तोंड उघडायला लावू नका, कोण जातायेत आणि कोण राहतायेत. माझ्याकडे जी माहिती आहे ती त्यांच्याकडेही नसेल. आमच्याकडचा गाळ गेलेला आहे, जे राहिलेत ते राहणारेच आहेत. अनेक संकटं वादळे झेलून ते पक्षाबरोबर आहेत. शिंदेंनी नवीन विचारधारा आणली आहे, पैसा फेको तमाशा, बाळासाहेबांचा हा विचार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *