महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखल फेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात. अमित शाह हे सहकार मंत्री आहे. पण अमित शाह जन्माला आलेल नव्हते तेव्हापासून या देशाचं सहकार मोठं आहे. अमित शाह म्हणतात ते काय मोठ नाही. जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केले आणि दबाव आणले. अनेक कारखानदार या महाराष्ट्रात दिल्लीला बोलविले जाते. कारखानदार यांच्यावर दबाव आणला जात आहे. ही मोडस ऑपरेंडी आहे, असं ते म्हणाले.
वाल्मिक कराडवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, या आधी सुद्धा प्रफ्फुल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती. ती त्यांनी सोडवली. इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्ती वरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या आणि आता ते भाजपमध्ये गेले. वाल्मिकी कराड तात्पुरता झाला असेल उद्या हा त्यांच्याच पक्षातील माणूस आहे. प्रफ्फुल पटेल यांचीही संपत्ती जप्त झाली होती. अख्खी यादी आहे. कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली. उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत हा परत संत होणार. भाजप हा त्याला संत पदाचा दर्जा देणार महामंडलेश्वर करेल, असं त्यांनी सांगितले.