Maha Kumbh: महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, अमृत स्नान रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जानेवारी ।। प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येनिमित्त संगम तिरावर लाखो भाविक जमले होते. परंतु या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या चेंगरीचेंगरी १० भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maha Kumbh)

महाकुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी अनेक भाविक आले होते. ही गर्दी खूपच जास्त होती. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १० जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी पोलिसांनी भाविकांना मदत केली आहे. सध्या महाकुंभमेळ्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे तर सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. त्यामुळे आज अमृत स्नान होणार नसल्याचे सांगितले जात आहे. (Maha Kumbh 2025)

महाकुंभमेळ्यात गर्दी खूप जास्त झाली होती. त्यामुळे भाविकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे ढकलाढकली सुरु झाली. यामुळे काही भाविकांना बॅरेकेडिंग तोडले. यामुळे गर्दीतील लोक इकडे तिकडे पळत होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत.

महाकुंभमेळ्यात जगातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होती. त्यामुळे आज १० कोटी भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नान कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *