महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी- २० मालिका जिंकलीय. मालिकेत भारताने ३-१ अशी आघाडी घेतलीय. त्यामुळे मुंबई टी-२० सामन्यानंतर फक्त टीम इंडियाचे खेळाडू ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ बनतील. ज्यामध्ये सध्या भारतीय संघातील १गोलंदाज आणि २ अष्टपैलू खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत. या मालिकेत भारतीय संघातून वेगवेगळ्या खेळाडूंनी आपली कमाल दाखवत संघाला सामने जिंकून दिलेत.
त्यामुळे या पुरस्कारासाठी एका खेळाडूची निवड करणं कठीण झालंय. सध्या इंग्लंडचा एकही खेळाडू ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ होण्याच्या शर्यतीत दिसत नाहीये. आदिल रशीदनेही काही सामन्यात चांगली कामगिरी केलीय पण तोही या शर्यतीत नाहीये. भारतीय संघातून कोणत्या खेळाडूंची नावे या ‘प्लेअर ऑफ द सीरीज’साठी चर्चेत आहेत, ते जाणून घेऊ.
वरुण चक्रवर्ती
टीम इंडियाचा मॅच विनर गोलंदाज वरुण चक्रवर्तीने या मालिकेत आतापर्यंत १६ षटके टाकली आहेत. यात त्याने ९.४२ च्या सरासरीने ११३ धावांत एकूण १२ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान वरुण चक्रवतीचा इकॉनॉमी रेट हा ७.०६ राहिलाय. चक्रवर्तीचा गोलंदाजीत स्ट्राईक रेट हा ८ राहिलाय. हा स्ट्राईट रेट खूप शानदार असल्याचं सांगितलं जात आहे. चक्रवर्तीचा फॉर्म पाहता तो मुंबईतही अप्रतिम कामगिरी करेल अशी आशा आहे. इतकेच नाही तर वरूण या मालिकेत दोनदा सामनावीर ठरलाय. त्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा पुरस्कार मिळू शकतो.
अभिषेक शर्मा
अष्टपैली अभिषेक शर्माने ४ सामन्यांच्या ४ डावात ३६ च्या सरासरीने १४४ धावा केल्या आहेत. यात एक अर्धशतकाचा समावेश आहे. शर्माचा सरासरी स्ट्राईक रेट हा १९७.२७ राहिलाय. अभिषेकने दोन षटकं टाकली आहेत. यात त्याने १६ धावा देत १ विकेट घेतलीय. मुंबईत होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा पॉवरप्लेमध्ये खेळ पलटू शकतो. त्यामुळे अभिषेक शर्माही प्लेअर ऑफ सीरिज बून शकतो.
हार्दिक पंड्या
वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्याने ११ षटके टाकली आहेत. यात त्याने ९२ धावांत ५ बळी घेतले आहेत. यासह पांड्याने ४ सामन्याच्या ४ डावात ३४.३३ च्या सरासरीने १०३ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. पांड्याचा स्ट्राईक रेट हा १३७.३३ राहिलाय. टीम इंडिआचा स्टार ऑलराउंडर पांड्याने मागील २ सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. मुंबईत होणाऱ्या सामन्यातही तो धमाकेदार फलंदाजी करेल अशी आशा चाहत्यांना आहे. यामुळे हार्दिक पांड्यालाच प्लेअर ऑफ सीरिजचा पुरस्कार मिळेल असं वाटतंय.