महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – दि. १६ ऑगस्ट – नांदेड – उशिरा का होईना केली तुटपुंजी मदत ; पोयोनियर डिस्टलरी पासूनच धर्माबाद तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव,ज्या कम्पनीच्या हलगर्जी पणा मुळे धर्माबाद तालुक्यात कोरोना महामारीचा मोठया प्रमाणात शिरकाव झाला असून त्या कंपनी विरुध्द दंडात्मक कारवाई करून कंपनीतील संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या व रोजनदाराच्या खात्यात 2 महिन्याचे वेतन ना परतावा ह्या हिशोबाने ध्यावे.व पायोनियर कंपनीने धर्माबाद ग्रामीण रुग्णालयास 5000 अँटीजन किट उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सौ.निता गायकवाड यांनी केली आहे.
धर्माबाद तालुक्यातील जनतेला कोविड विषाणूच्या प्रादुर्भावा पासुन सुरक्षिता देण्यासाठी पायोनियर डिस्टलरिज लि. बाळापुर ता.धर्माबाद या भागातील कंपनी व्यवस्थापनाकडे नविन कोविड सेंटरला बेडची व्यवस्था करण्यात यावी असा प्रस्ताव दिला होता.या प्रस्तावावर कंपनी व्यवस्थापनाने सामाजिक बांधिलकी दाखवुन ५० बेड,१००लिटर सैनीटायझर ,१००० हजार सर्जिकल मास्क, २ नग थर्मामीटर INF IRT, ५ नग पल्सअॉक्सिमीटर, आणि पी पी ई किट २ नग इत्यादी देण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन आज दि.१५.८.२० रोजी धर्माबाद नगर पालिकेच्या नविन कोविड सेंटरला सुपूर्द केले असल्याचे कळाले ते फारच तुटपुंजी मदत आहे.महिन्याला अब्जावधी चे देवाण घेवाण असलेल्या कंपनीची ही मदत तोकडी आहे , साहित्यचं पाहिजे असतेतर फक्त दानशूर धर्माबाद शहरातील व्यापारीही ख़ुशी ख़ुशी ने प्रशासनास दिले असते. प्रशासनाणे या कंपनी विरुध्द दंडात्मक कार्यवाही करणे अपेक्षित होते .
धर्माबाद तालुका व शहरातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीने वेळप्रसंगी मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण ही करावे लागेल तर मी ते ही करावयास तयार आहे.असे धर्माबाद नगरीच्या माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस नांदेड यांनी गंभीर इशारा दिला आहे.
धर्माबाद येथील मा.उपजिल्हाअधिकारी राजेंद्र शेळके साहेबांच्या हस्ते नविन ५० बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असे ही सांगण्यात आले आहे यावेळी तहसिलदार मा.दत्तात्रय शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे मॅडम व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.शेख इकबाल,डॉ.केशटवार व नगरपालिका चे कर्मचारी आणि पायोनियर डिस्टलरिज लि कंपनी व्यवस्थापना च्या वतीने कंपनीत नियुक्त उत्पादन शुल्क अधिकारी पंकज कुंभार , मा.एच.आर.व वेलफेअर अधिकारी हेमंत कोंढाळकर ,गुणवत्ता विभाग प्रमुख मा.पवनकुमार,जिना प्लांट विभाग प्रमुख मा.राजशेखर,इंजिनीअरिंग विभागाकडून वैभव बोडे,आणि कंपनीतील मराठवाडा राष्ट्रीय पायोनियर डिस्टलरिज कामगार संघ, बाळापुर संघटनेचे जनरल सेक्रेटरी वाय.बी. पवार ईतर कर्मचारी उपस्थितीत होते असे ही सांगण्यात आले आहे. .