महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ फेब्रुवारी ।। ‘छावा’ चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.’छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत.
‘छावा’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई केली आहे. जवळपास 5 कोटींची व्यवसाय त्यांनी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘छावा’ चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत.’छावा’ चित्रपट तीन ते चार महिन्यांनंतर तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
बजेट किती?
‘छावा’ चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने दोन दिवसात बंपर कमाई केली आहे. ‘छावा’ चित्रपटाने दोन दिवसात तब्बल 67.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. ‘