महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ फेब्रुवारी ।। राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवत आहेत. बऱ्याच ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या २४ तासांत तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच पुण्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पुण्यात ३५.८ अंश सेल्सियसवर तापमानाची नोंद झाली आहे. तसेच ठाण्यात ३६.६ आणि सांगलीत ३७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय अकोला, सोलापूर, जेऊर, परभणी येथे पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे.
तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू वाहत आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १ ते २ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे – ३५.७
अहिल्यानगर-३४.८
धुळे-३६.५
जळगाव-३४.४
जेऊर-३७.०
कोल्हापूर- ३४.६
महाबळेश्वर- ३१.६
मालेगाव- ३४.०
नाशिक-३५.२
निफाड- ३४.०
सांगली- ३७.२
सातारा-३६.२
सोलापूर-३७.३
सांताक्रूझ-३३.४
डहाणू- ३२.२
रत्नागिरी-३५.१
छत्रपती संभाजीनगर- ३६.२
धाराशिव-४.२
परभणी- ३७.०
परभणी (कृषी)- ३४.९
अकोला- ३७.६
अमरावती- ३६.४
भंडारा- ३५.८
बुलडाणा- ३५.०
ब्रह्मपुरी-३८.०
चंद्रपूर- ३६.२
गडचिरोली- ३६.०
गोंदिया- ३४.८
नागपूर- ३५.४
वर्धा- ३६.५
वाशीम- ३५.६
यवतमाळ- ३४.०