LPG Gas: महागाईच्या झळा ! LPG गॅसच्या किंमती वाढल्या, तुमच्या शहरातील दर किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १ मार्च ।। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. मार्च महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होत असतात. दरम्यान या महिन्यात किंमती वाढल्याने आता सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. १ मार्च २०२५ पासून १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहे.कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जो सिलिंडर आधी फक्त १७९७ रुपयांना मिळायचा. त्याच्या किंमती वाढून १८०३ रुपये झाल्या आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले आहे. मार्च महिन्यात अनेक सण आहेत. होळी, ईदच्या महिन्यात सिलिंडर महाग झाले आहे. उद्यापासून रमझान सुरु होणार आहे. अशातच कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये हे भाव वाढले आहेत. (LPG Gas

तुमच्या शहरातील एलपीजी गॅसचे दर
मुंबईत याआधी एलपीजी गॅसच्या किंमत १७४९.५० रुपये होत्या. आता या गॅसची किंमत १७५५.५० रुपये झाली आहे. दिल्लीत एलपीजी गॅसच्या किंमत १७९७ रुपयांवरुन १८०३ रुपये झाल्या आहेत. चेन्नईत एलपीजी गॅसच्या किंमती १९५९ रुपयांवरुन वाढून १९६५ झाल्या आहेत.

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल नाही
कमर्शियल गॅसच्या किंमतीत बदल झाला असाल तरीही घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गृहिणींच्या महिन्याच्या बजेटवर फार कोणताही बदल होणार नाही. परंतु कमर्शियल गॅसच्या किंमतीतील बदलांचा परिणाम हा हॉटेलच्या बिलावर होऊ शकतो. हॉटेलच्या बिलांच्या किंमतीत कदाचित वाढ होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *