महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची केझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात मराठी कलाकारांनी देखील दमदार भूमिका केली आहे. ‘छावा’ चित्रपटातून लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे. ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) साकारली आहे.
दुसरा दिवस – 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस 24 कोटी रुपये
पाचवा दिवस – 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस – 32 कोटी रुपये
सातवा दिवस 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस 23 कोटी रुपये
नववा दिवस – 45 कोटी रुपये
दहावा दिवस – 40 कोटी रुपये
अकरावा दिवस – 19.10 कोटी रुपये
बारावा दिवस – 18.5 कोटी रुपये
तेरावा दिवस – 21.75 कोटी रुपये
चौदावा दिवस- 12 कोटी रुपये
पंधरावा दिवस – 400 कोटींचा टप्पा पार
सोळावा दिवस – 21 कोटी रुपये
सतरावा दिवस – 25 कोटी रुपये
अठरावा दिवस – 8.50 कोटी रुपये
एकोणिसावा दिवस – 5.50 कोटी रुपये
विसावा दिवस – 5.75 कोटी रुपये
एकवीसावा दिवस – 5.53 कोटी रुपये
बाविसावा दिवस – 8.5 कोटी रुपये
एकूण – 492.05 कोटी रुपये
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. हा शानदार चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. ‘छावा’ दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता 22 दिवस पूर्ण झाले आहेत. आता ‘छावा’ चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 500 कोटींचा व्यवसाय पूर्ण करणार आहे.
‘छावा’ने रिलीजच्या 22व्या दिवशी देखील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘छावा’ने 22व्या दिवशी 8.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 22व्या दिवशी ‘छावा’ने ‘आरआरआर’, ‘स्त्री 2’ आणि ‘केजीएफ 2’ ला मागे टाकले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ 22व्या दिवशी 4.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘केजीएफ 2’ने 22व्या दिवशी 6.26 कोटींची कमाई केली तर ‘स्त्री 2’ ने 5.31 कोटी कमावले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ‘छावा’ चित्रपटाने जगभरात जवळपास 700 कोटींचा व्यवसाय केला आहे.