महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर आले आहेत. आज महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याती शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी कदाचित २१०० रुपयांबाबत घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. (Ladki Bahin Yojana Update News)
लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये मिळत आहेत. २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये अर्थसंकल्पानंतर जमा होतील, असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केले होते. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत संभ्रम
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी मोठं विधान केलं होतं. लाडक्या बहिणींना यावर्षी २१०० रुपये देऊ, अशी कोणतीही घोषणा आम्ही केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.