Digital Payment: ऑनलाइन पेमेंट महागणार ? UPI आणि रुपे डेबिट कार्डवर शुल्क लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण ऑनलाइन पेमेंट करतो. यूपीआय कोड स्कॅन करुन काही सेकंदात पैसे पाठवतो. अगदी मुलाच्या शाळेची फी भरणे असो किंवा भाजी घेणे प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाइ पेमेंटचा वापर करतो. परंतु आता यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड पेमेंट महागणार आहे. (Digital Payment)

यूपीआय पेमेंट आणि RuPay डेबिट कार्डच्या ट्रान्झॅक्शनवर आता जास्त चार्जेस लागू शकतात. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट आता महागणार आहे. या ट्रान्झॅक्शनवर सध्या मर्चंट डिस्काउंट रेट चार्ज होतो. जो दुकानदार आपल्या बँकेला डिजिटल पेमेंट प्रोसेस करण्यावेळी देतो. सध्या सरकारने ही फी माफ केली आहे. परंतु लवकरच ही फी पुन्हा लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, बँकिंग इंडस्ट्रीकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यानुसार, ज्या दुकानदारांचे वार्षिक टर्नओवर हे ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना MDR लागू केला जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावावर सरकारने अद्याप विचार केलेला नाही. परंतु ४० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या दुकानदारांना कोणत्याही प्रकरची MDR फी लागू केली जाणार नाही.

या प्रस्तावानुसार, सरकार टियर सिस्टीम लागू करु शकते. म्हणजेच मोठ्या व्यापारांना जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे मोठ्या व्यापारांना दर महिन्याला होणाऱ्या डिजिटल पेमेंटवर चार्ज करावे लागणार आहे. या व्यापारांचे महिन्याला लाखो- कोट्यवधी रुपयांचे डिजिटल ट्रान्झॅक्शन असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *